धारणात् ‘धर्मः’?
आपल्या देशामध्ये धर्माची व्याख्या धारणात् धर्मः।’ अशी केलेली असून त्याबद्दल कोणतीही शंका उरू नये म्हणून लगेच धर्मो धारयते प्रजाः । असेही विधान केलेले आहे. अथातो ब्रह्मजिज्ञासा असा संकल्प उच्चारण्यापूर्वी हजारो वर्षापूर्वी प्रजांना म्हणा किंवा प्राणिमात्राला धारण करणारा धर्म अस्तित्वात होता आणि तो केवळ माणसांमध्येच नसून कृमिकीटकांपासून तो पशुपक्ष्यांतही होता. मुंग्यांची वारुळे, मधमाश्यांची मोहळे, दिगंत संचार …